ओळख

निखळ विनोद मन प्रसन्न करतो, पोट धरून हसवतो. वेगळे विषय मनाला स्पर्श करुन जातात, चटका लावतात, भावनाविवश करतात, विचारांना चालना देतात. मराठी नाटक आपला जिव्हाळ्याचा विषय. त्याचंच लघुस्वरुप म्हणजे एकांकिका.
अभिव्यक्तीच्या दरवर्षीच्या कार्यक्रमामागे हाच उद्देश असतो. नाट्यगृह खर्च, जाहिरात, नेपथ्य, संगीत, पत्रकं, तिकिटं, टेक डे, बेबीसिटींग, सरावाच्या वेळा, व्यवस्था आणि त्या बरोबर येणार्‍या अडचणी, अडथळे अशी व्यवधानं सांभाळावी लागतात, पण त्याचबरोबर कितीतरी गोष्टीचं स्वातंत्र्य अबाधित राहतं. कल्पना प्रत्यक्ष उतरवता येतात. याला साथ असते अथकपणे महिनो न महिने सराव करणार्‍या कलाकारांची. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना सांभाळणार्‍यांची आणि अर्थातच कलाकारांच्या घरातील इतर मंडळीची.

इतकं सगळं झालं की उरतो तो मायबाप रसिकांचा पाठींबा. प्रेक्षकांसाठी हा एक फक्त दिवस असतो, आमच्यासाठी सहा महिन्यांची तयारी त्या एका दिवशी ’पणा’ ला लावायची असते.. तुम्ही आवर्जून एकांकिका पहायला येता, कौतुक, मार्गदर्शन करता, वेगवेगळे विषय सुचवता आणि पुन्हा पुढच्या वर्षीची तयारी मनात सुरु होते.

’अभिव्यक्ती’ तर्फे सादर झालेल्या एकांकिका/नाटक

Advertisements

मंतरलेली चैत्रवेल

एक झंझावत. झोडपलं गेलेलं घर आणि त्या पडझडीत स्वत:चं रहस्य जपत वावरणारी माणसं. आपापल्या रहस्याला कवटाळून बसलेली. या माणसाच्यासहवासात बाहेरच्या व्यक्तींचा प्रवेश होतो आणि ती देखील या रहस्याचा एक भाग बनून जातात. प्रत्येकाचं आयुष्य बदलून जातं. गुंतागुंत वाढत जाते. कसा सोडवतात हा गुंता ही सारीजणं? काय होतं अखेर?


एक झंझावत. झोडपलं गेलेलं घर आणि त्या पडझडीत स्वत:चं रहस्य जपत वावरणारी माणसं. आपापल्या  रहस्याला कवटाळून बसलेली. या माणसाच्यासहवासात बाहेरच्या व्यक्तींचा प्रवेश होतो आणि ती देखील या रहस्याचा एक भाग बनून जातात. प्रत्येकाचं आयुष्य बदलून जातं. गुंतागुंत वाढत जाते. कसा सोडवतात हा गुंता  ही सारीजणं? काय होतं अखेर?

कलाकार: मोहना जोगळेकर, जागृती देशमुख, राजेन्द्र झगडे, सुबोध जोगळेकर, चिन्मय नाडकर्णी, मेघना कुलकर्णी.

मोहना आणि विरेन जोगळेकर निर्मित, ’अभिव्यक्ती’ प्रस्तुत रहस्यमय, उत्कंठावर्धक २ अंकी नाटक – मंतरलेली चैत्रवेल
शनिवार दिनांक १० डिसेंबर २०१६

स्थळ – Bundy Auditorium – 476 Hubbard Dr, Lancaster, SC

मूळ लेखक – सुरेश खरे, संहिता बदल – मोहना जोगळेकर. काव्यरचना – मोहना जोगळेकर, काव्यगायन – दिप्ती ओक.
नेपथ्य – विरेन जोगळेकर, गौरव लोहार.
नेपथ्य सहाय्य – चिराग दुआ, बोस सुब्रमणी, राजीव आणि वेदिका तोंडे, अनिता आणि तन्वी जोगळेकर, ओंकार आणि जागृती तळेकर, पर्णिका जोगळेकर.रंगभूषा – वेदिका तोंडे, मेघना कुलकर्णी.
सहाय्य – मीनल झगडे, रुपाली नाडकर्णी, अमोल कुलकर्णी.
छायाचित्र – नितीन पटवर्धन.
चित्रीकरण – सुखदा गोखले.