रॅले येथील प्रयोगातील कलावंत: विद्याधर कुलकर्णी, मोहना जोगळेकर, चैतन्य पुराणिक.


शार्लट प्रयोग कलाकार: संजय कुलकर्णी, मोहना जोगळेकर, सुबोध जोगळेकर


सत्यशील, माधुरी हे श्रीमंत होण्याची  स्वप्न पाहणारं मध्यमवर्गीय जोडपं.  मेन्युकार्ड आधी किंमत मग पदार्थ असं न वाचता उलट्या क्रमाने वाचता यायला हवं अशी आस बाळगलेलं. अचानक मनात बाळगलेल्या कितीतरी इछा पुर्ण होतील अशी एक संधी दाराशी येऊन उभी राहाते. विचारांती त्या वाटेने जाण्याचा निर्णय दोघं घेतात. ही वाट झटपट श्रीमंतीकडे नेणारी. सुखात लोळता येईल अशी. या चैनी राहणीमानाला गुन्ह्याचं गालबोट चिकटणार हे तर दोघांनी गृहित धरलं आहेच. प्रश्न उरतो तो या वाटेवरचे खाचखळगे पार पाडण्यासाठी दोघांनी केलेले बेत व्यवस्थित पार पडतायत का याचा. सर्व काही ठरवल्यासारखं पार पडतय  असं वाटत असतानाच पोलिसांचा प्रवेश होतो….. होतो सत्यशील आणि माधुरीचा कट यशस्वी ? पाहा जीवनगाणे…..या कल्पनेवर आधारित ’खेळ’ या रहस्यमय एकांकिकेतला शह, आणि काटशाह…..


शार्लट आणि ओहायो येथील प्रयोगातील कलावंत: संजय कुलकर्णी, मोहना जोगळेकर, सुबोध जोगळेकर


Advertisements