कलाकार: मोहना जोगळेकर, श्रीकुमार डोंगरे, हर्षद साखळकर


युद्धभूमीवर जीवनाची अनिश्चितता,  मृत्यूशी लढा, वीरमरण हे अलिअखित सत्य असलं तरी त्याचा उच्चार करणंही कठीण वाटतं. युद्धावर लढणा‍र्‍या वीरांना या गोष्टींचा विचार करायलाही वेळ नसतो. पण मागे राहिलेले जीवलग एक अनामिक हुरहुर मनाशी जपत आपल्या माणसाची प्रतिक्षा करत राहतात. या प्रतिक्षेला अंत नाही म्हटल्यावर खेडवळ जाई श्रीपतीच्या शोधात सीमेवर पोचते. जीव दडपून जाईल अशा त्या भल्या थोरल्या भिंतीसमोर जाई येवून उभी तर ठाकते, पण रोखलेल्या डोळ्यांनी भेदरते, घाबरते. श्रीपतीला माघारी घेवून जाण्याचा तिचा निश्चय मात्र तसुभरही ढळ्त नाही. जाईच्या रुपाने मृत्युच्या कराल दाढेतून सुटकेचा किरण दिसण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रत्येक सैनिकाला तो श्रीपती आपणच असावं अशी ओढ लागते. त्यातूनच सुरु होतो आठवणींचा खेळ! जाई आणि सैनिकाच्या या खेळाला साथ लाभते सेनापतीची आणि सुरु होतं नाट्यांतर्गत नाट्य या कल्पनेवर आधारित नाट्य – भिंत.


Advertisements