झलक – गेल्या दोन वर्षअखेर मुलांनी  सादर केलेल्या कार्यक्रमाची.


देश तसा वेष ही उक्ती भाषेबद्दलही स्वीकारत आपण आपली आणि मुलांची मुळं जाऊ तिथे रुजवतो. पण मातृभाषेची नाळ तूटून जाण्याआधी पक्की करायला हवी असं वाटून जाणारा क्षण आयुष्यात डोकावतोच. मग ती वेळ न येऊ देण्याची वेळीच का काळजी घेऊ नये? घरातील भाषा मराठी आणि व्यवहाराची इंग्रजी हे सहजसाध्य आहे. संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे की एकापेक्षा अधिक भाषा आल्या तर आकलनाची, अडचणी सोडवण्याची, संवाद साधण्याची, समजून घेण्याची क्षमता कितीतरी पटीने वाढते.

शाळेत दर रविवारी मराठी मुलांचा किलबिलाट असतो. हसत खेळत शिका या  तत्वाच्या आधारे मुलं मराठी शिकतात. इथे मुलं शिकता शिकता स्वत:च गोष्टी तयार करतात, छोटे छोटे प्रवेश सादर करतात, खो, खो, कबड्डी सारखे खेळ खेळतात. सारं मराठी शिकत शिकत.

Advertisements