कलाकार: संदिप केसरकर, पूर्वा केसरकर, श्रीकुमार डोंगरे, हर्षद साखळकर, अपर्णा साखळकर, संजय भस्मे, ऋत्विक जोगळेकर, गौरी गंधे, श्रीनिवास जोशी, विद्याधर कुलकर्णी, विजय दरेकर. निवेदन:प्रशांत पै, सुधांशु गंगातीरकर, मोहना आणि ऋत्विक जोगळेकर

मोठ्या उत्साहाने महाभारताच्या तयारीला लागलेल्या दिग्दर्शिकेला पांडव, कौरव, कृष्ण, द्रौपदी हे सगळे कलाकार मिळणं आणि तेही हातीपायी धड, वाटतं तितकं सोपं रहात नाही. हाती आलेल्या कलाकारांना घडविताना, त्यांच्याकडून अभिनय करुन घेताना तालमीमध्येच या महाभारताचं उत्तररामायण कसं घडतं याची पोट धरुन हसायला लावणारी ही झलक… नाट्यांतर्गत नाट्य या कल्पनेवर आधारित एकांकिका.


Advertisements