युववाणी आणि निवेदक म्हणून आकाशवाणीत काम करायला लागल्यावर प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांनी दै. रत्नभूमीचे संपादक पालांडे यांना माझं नाव सदर लेखनासाठी सुचवलं आणि वर्षभर मी ’तरुणाई’ सदराच्या निमित्ताने  लिहिती राहिले. ही माझ्या लेखनाला खर्‍या अर्थी सुरुवात. त्यानंतर आतापर्यंत सातत्याने विविध वर्तमानपत्रात लेख, कविता प्रसिद्ध. लोकसत्ता, श्री. व सौ., बृहनमहाराष्ट्र वृत्त (BMM) साठी सदर लेखन. विविध मासिकांतून, दिवाळी अंकासाठी कथालेखन. हा प्रवास अखंड चालूच आहे.

वर्तमानपत्र, मासिकं यातून प्रसिद्द झालेले लेख, सदरांतर्गत केलेलं लेखन तसंच कथा, विनोदी अनुभव, कविता माझ्या ’मोसम’ या ब्लॉगवर वाचता येतील. नक्की भेट द्या – मोसम

mosam_banner

Advertisements