शारलट  प्रयोग कलाकार – रणजित गुर्जर, मेघना कुलकर्णी, सुप्रिया गरुड, मोहना जोगळेकर, बोस सुब्रमणी.


रॅले प्रयोग  कलाकार: पंकज शेट्ये, अंजली भस्मे, पुर्वा केसरकर, स्नेहल भागवत, विजय दरेकर.


तामिळनाडू मधील लहानसं गाव. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. संथ चालीचं, झोपाळलेलं. या खेडेगावात पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यात राहणारे शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. पूजा अर्चा करत उपजिविका करणारे. मराठी भाषिक वार्ताहार राहण्याची सोय होईल या विचाराने येतात तेव्हा तर शास्रीबुवा हरखूनच जातात. मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्रीबुवांचा मनस्वी आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना त्या वार्ताहारांच्या आगमनाने घडत राहतात. घडणारं सारं त्या दोघींच्या कल्पनेपलीकडचं, भूतकाळाच्या खपल्या ओरखणारं. पुजारीबुवाचं आयुष्य तर भोव‍‌‌‍र्‍यात सापडल्यासारखं ढवळून निघतं. वार्‍याच्या वेगाने अनपे‍क्षित वळण घेतं. आता हे इथेच थांबणार की वाड्यात राहणारी, डोकावणारी, येणारी प्रत्येक व्यक्ती या वादळात अडकणार, झोडपून निघणार?
‘मुखवटे आणि चेहरे’या कल्पनेवर आधारित एकांकिका – वेषांतर.


शारलट  आणि क्लिवलंड प्रयोग कलाकार – रणजित गुर्जर, मेघना कुलकर्णी, सुप्रिया गरुड/जागृती देशमुख, मोहना जोगळेकर, बोस सुब्रमणी.

 

Advertisements