रॅले  येथील प्रयोगातील कलाकार : मिलिंद डबली, मनिषा बागडे, श्रीनिवास जोशी, अनिल साने, आरती जोशी, ऋचा बिल्दीकर, स्नेहल भागवत,  राजन कुबल,  मोहना जोगळेकर. पाहुणे कलाकार :- विवेक वैद्य, विजय दरेकर


राजाभाऊ आणि उषाक्का सत्तरी ओलांडलेलं जोडपं. राजाभाऊंना एकाएकी बायकोशी इतकी वर्ष झालेल्या संसारात ते अधून मधून जरा ’वाईट्ट’ वागले होते ते आठवायला लागतं.  उषाक्कांना ते सांगून टाकावं असंही त्यांना वाटायला लागतं. फार फार तर  त्या थोडीशी कटकट करतील…., तशी ती केली तरी आता ऐकू येत नाहीच त्यामुळे  फार काही बिघडणार नाही, आणि वाद घालायचा तर राजाभाऊ पटाईत…. असा सगळा विचार करुन मनातली रुखरुख मोकळी करुन टाकायचं पक्कं करतात. पुन्हा एकदा तरुण पण अनुभवायला सज्ज होतात. त्यावेळेस केलेली ती मज्जा, गोंधळ ते स्वत:च्या आणि उषाक्कांच्या नजरेसमोर पुन्हा एकदा उभा करतात. होतात या गोंधळात उषाक्का सामील…? ‘ जीवनगाणे’ ह्या कल्पनेवर आधारित विनोदी एकांकिका ’ सांगायचं राहिलंच’.


शारलट  येथील प्रयोगातील कलाकार – संदीप कुलकर्णी, प्रज्ञा आपटे, रणजित गुर्जर, मेघना कुलकर्णी, राजेश पेंडूरकर, गीता दातार, शैलजा मेहता, संजीव डांगे,  संगीता कोरडे. पाहुणे कलाकार :- सुहास वैद्य, आशिष चितळे.

Advertisements