झलक आणि ओळख

’अभिव्यक्ती’ तर्फे सादर झालेल्या एकांकिका:

 

 


निखळ विनोदाने मन प्रसन्न होऊन जातं, चार घटका करमणूक करणारा विनोद पोट धरून हसवतो. वेगळे विषय मनाला स्पर्श करुन जातात, काही चटका लावतात तर काही भावनाविवश करतात, विचारांना चालना देतात. मराठी नाटक हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. त्याचंच लघुस्वरुप म्हणजे एकांकिका.

अभिव्यक्तीच्या दरवर्षीच्या कार्यक्रमामागे हाच उद्देश असतो. स्वतंत्र्यरित्या कार्यक्रम करताना थिएटर आरक्षण खर्च, जाहिरात, नेपथ्य, संगीत, पत्रकं, तिकिटं, टेक डे, बेबीसिटींग, सरावाच्या वेळा, व्यवस्था आणि त्या बरोबर येणार्‍या अडचणी, अडथळे अशी असंख्य व्यवधानं सांभाळावी लागतात, पण त्याचबरोबर कितीतरी गोष्टीचं स्वातंत्र्य अबाधित रहातं. कल्पना प्रत्यक्ष उतरवता येतात. याला साथ असते अथकपणे महिनो न महिने सराव करणार्‍या कलाकारांची. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना सांभाळणार्‍यांची आणि अर्थातच कलाकारांच्या घरातील इतर मंडळीची. प्रयोगाच्या दिवशी त्यांची होणारी मदत आणि मुख्य म्हणजे कलावंताना सरावासाठी वेळ घालवू देण्याची दिलेली परवानगी!

इतकं सगळं झालं की उरतो तो मायबाप रसिकांचा पाठींबा. प्रेक्षकांसाठी हा एक फक्त दिवस असतो, आमच्यासाठी सहा महिन्यांची तयारी त्या एका दिवशी ’पणा’ ला लावायची असते.🙂. तुम्ही आवर्जून एकांकिका पहायला येता, कौतुक, मार्गदर्शन करता, वेगवेगळे विषय सुचवता आणि पुन्हा पुढच्या वर्षीची तयारी मनात सुरु होते.

Advertisements

Tags: , ,